Home > Poems । माझ्या काही कविता > कुत्रं झोपलं होतं

कुत्रं झोपलं होतं

कुत्रं झोपलं होतं


हा फोन वर बोलत होता
त्याच्याकडे बिलकूल वेळ नाही
हा तिच्या डोळ्यात हरवलेला
तिचा वास्तवाशी मेळ नाही

ते सगळे हॉटेलात खाऊन
त्यांच्याच धुंदीत फिरत होते
सगळेच त्याला बघून मग
न बघितल्यासारखं करत होते

सगळ्यांना दिसून अदृश,
ते कुत्रं झोपलं होतं


त्याचा माणसाबरोबरचा हा
रोजचा अलिखित करार असतो
तो माणसाला चावत नाही आणि
माणूसही त्याच्यावर भुंकत नसतो

कोणाच्या अध्यात न मध्यात
जनावर माणसासारखं वागू लागलं होतं
माणसाने माणसाला कुत्र्यासारखं वागवलं
तरी कुत्र्यांना खुशाल झोपू दिलं होतं


त्याने आंदोलन बघितलं नाही
आणि मोर्चा ही पाहिला नाही
गर्दीत हरवलेली तत्त्वं कुठेतरी
त्यांची चर्चा ही ऐकली नाही

त्याचा पक्ष पण नव्हता ठरलेला
आणि त्याने मत द्यायचं सोडलं होतं
निवांत रस्त्याच्या कडेला
ते कुत्रं झोपलं होतं


त्याने देवळाबाहेर श्रध्देनं फुलांचे
हार विकले जाताना पाहिलं होतं
देवळातली घंटा वाजून ते हार
देवापर्यंत पोचताना पाहिलं होतं

परत थोड्यावेळाने तेच हार त्याच
दुकानात विकताना पाहिलं होतं
देव दगडी, तो अबोल, म्हणून
हे रहस्य लपताना पाहिलं होतं

एकाच हाराने कितीतरी वेळा
प्रार्थना आणि पोटं भरताना पाहिलं होतं
फुलांचं हे पवित्र आणि अपवित्र होताना
त्याने, त्यांना गोंधळताना पाहिलं होतं

खरी पुण्यवान फुलंच, त्यांना
सतत देव-दर्शन मिळालं होतं
काही बोलता येत नाही म्हणून
नुसतंच ते कुत्रं झोपलं होतं

— मयुरेश कुलकर्णी


दोष तर कुणाचाच नसतो
पण निर्दोषही कुणी नाही
गुन्हा पण सगळेच करतात
आणि गुन्हेगार कुणी नाही

तुरूंगात जाता कैदी सारे
पण न्याय मिळतोच असं नाही
माणूस माणसासारखा फक्त दिसतो
म्हणून तो माणूस असतोच असं नाही

काहींचं सहन करण्यात जातं जीवन
आणि मग मोक्ष म्हणून मरण मिळतं
प्रत्येकाने स्वत:साठी जगलं की
याला समाज असं नाव मिळतं

माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं
हे फक्त त्या कुत्र्याला कळालं होतं
म्हणून मुकं बिचारं ते, आकाशवाणीची
वाट बघत रस्त्याकडेला झोपलं होतं

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. bhakti
  August 7, 2010 at 11:54 am

  aatchi paristit ashich aahe

  shikaloy khup aapan pan sushikshit aapan nahi,
  dolyat dekhat hovun hi dolas aapan nahi,
  time pass karato aapan pan time aapalyakadhe nahi,
  swatala manus mhanato pan manus aapan nahi,

  ekdam kadu vatel pan khar asalele he satyat

  nakalt charoli tayyar zali badh

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: