कोरा कागद

कोरा कागद


कप माझा रिकामा

पाऊस सगळ्यांवरच पडत होता
सगळ्यांना सारखंच भिजवत होता

काही छलाखाली थांबले होते
काही घराकडे धावले होते
काही छ्त्रीखाली लपत होते
पावसाला नावं ठेवत होते

कप माझा कॉफीने भरलेला
मी पटकन रिकामा केला
पावसात घेऊन गेलो त्याला
तो स्वर्गाच्या पाण्याने भरला

मी थंडीत उभा वेडा
देवाकडचं पाणी पित होतो
कप रिकामा झाला की
नियमितपणे भरत होतो

देव धरतीला प्रेमाने भिजवत होता
माझा कप विचारांनी भरत होता
पाऊस सगळ्यांवरच पडत होता
सगळ्यांना सारखंच भिजवत होता

आज पाऊस गेला तरी
मी अजून तेच करतो
नव्या विचारांसाठी कप
कागदावर रिकामा करतो

— मयुरेश कुलकर्णी


कोरा कागद

आज मला जगाचा आला कंटाळा
जगायचा नाही, जिवनाचाही नाही
मला जगाचा आला कंटाळा

आणि मला जगाचा आला कंटाळा
म्हणून मनाला जगायचा आला कंटाळा

रोज रोज तेच तेच करायचं
हे जिवनाचं वर्तूळ का कळत नाही?
या वर्तुळाचा अर्थ होतो शून्य
हे माणसाला का कळत नाही?

जिवनाचं चित्र एक वर्तूळ
यात अडकायचा त्रास होतो
हातातल्या साखळ्यांची सवय झाली
की स्वतंत्रतेचा भास होतो

आता मी कागद कोरा केला
मी जिवनाचं वर्तूळ खोडलं
जगात जगतो अजूनही पण
जगासारखं जगणं सोडलं

आता माझे विचार रंगवायला
माझा कागद आमंत्रण देतो
आणि कागद शाईने भरले तरी
मी मन अजूनही कोरंच ठेवतो

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: