Home > Characters | व्यक्ति आणि व्यक्तित्व > व. पु. काळे | Vasant Purushottam Kale

व. पु. काळे | Vasant Purushottam Kale

Vasant Purushottam Kale (25 March 1933 – June 27, 2001), popularly known as Va Pu, was a Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches. He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.

V.P. Kale was an architect by profession. His writings reflect the philosophy of Acharya Rajanish.

He died of heart failure in Mumbai on Jun 27, 2001.

Some Quotes : (More info : http://en.wikipedia.org/wiki/Vasant_Purushottam_Kale)

व. पु. काळे

जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते.

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरूक राहावं लागतं.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाण्वते.

अत्तराची बाटली संपतानाच जपायची असते.

दु:ख पराभवाचं नसतं. फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो, त्याचं दु:ख होतं. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.

Advertisements
 1. Keerti
  July 21, 2010 at 9:54 am

  Hay dear,
  the lines are very innovative and introward.
  Make our lives easy…….

 2. bhari ye
  July 22, 2010 at 1:24 pm

  layi bhari

 3. Deepa
  July 28, 2010 at 6:40 am

  जेव्हापासून वाचतीये तेव्हापासून व.पु. वाचतीच आहे. कित्येक वेळा पारायण केलं तरी व. पुं च्या कथेत दर वेळी नवीन काहीतरी भेटतं. माझी अत्यंत आवडती. “तू भ्रमत आहासी वाया” आणि ठिकरी.

  पुस्तकांबरोबरच व.पुं चं कथाकथन देखील अफ़लातून होतं झिंटू, तूच माझी वहिदा, दोंदे…. अशा कित्येक कथा कित्येक वेळा ऐकल्या आहेत.

  My all time favourite…

 4. August 16, 2010 at 4:39 am

  hey khup chaan ahe!!!

 5. Santoshi
  September 7, 2010 at 11:03 am

  Va.Puncha best pustak for me is Partner. Khup aavadal he pustak agadi swataha jagat aslyasarakh may be Va.Punchya likhanachi jadu hoti. Tyanche shabd khup sahaj sundar sope astat. And yes Sakhi the best one at least te striyana evadh samajale.

 6. yogita
  September 8, 2010 at 11:49 am

  Mala vapunchi sarvach pustak avadali. pratyek pustak kahi na kahi navin shikvun ani sangun jaat. pratyek katha sunder ahe, vapuchi bhashashailish itaki apratim ahe ki tyana vachalyavar kahi vachavasach nahi vatat. Va. Pu. is Really Great!

 7. Pragati
  September 11, 2010 at 5:54 am

  Hey Mayuresh,
  vapunchi pustaka masta astat..
  ani quotes pan bhari ahet..
  Vapuncha mala avadanara vakya mhanaje
  “apalyala garaj astana viruddha dishene janara rikama vaahan mhanaje BUS. ”
  keep posting..cya

 8. Pavan khairnar
  October 31, 2012 at 9:02 am

  Va. Pu . Mhanje aajramar lekhak , tyanna sashtang dandavat.kadhich hatavegli karu nayet aashi pustaka.

 9. v p
  January 23, 2013 at 6:35 am
 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: