तू

तू

माहिती आहे मला, काय काय सहन करतेस तू
दिवसा लोकांपुढे निर्भय, रात्री स्वत:लाच घाबरतेस तू

काहीतरी सांगायचं असतं तुला
परिणामाला घाबरून, शांत राहातेस तू

शांततेतही इतकी ताकद तुझ्या
कळणाऱ्यांशी मौनातून बोलतेस तू

नशिबाबरोबर लढायला तयार,
रात्री अश्रुंनी उशी भिजवतेस तू

जी एकटी वाढतात, ती झाडं मजबूत बनतात
कोमलता कमी होऊ न देता, कठोर बनतेस तू

(जगाच्या काळ्या वादळात रोज
पांढऱ्या घोड्यावर जातेस तू)

आत्मविश्वास कमी झालाच कधी तर
त्याला मनाच्या कोपऱ्यांत शोधतेस तू

आजच्या अन्यायाला कुशीत घेऊन
न्यायाची स्वप्ने बघत झोपतेस तू

— मयुरेश कुलकर्णी

  1. vivek phutane
    October 4, 2010 at 5:26 pm

    Sundar….

  2. Shirin
    October 7, 2010 at 4:52 am

    one of my Fev.

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: