आजी साठी भेट

आजी साठी भेट

आजीवर कविता करायला
वेळ कधीच लागत नाही
इतक्या भावना शब्दात
टिपू कशा ते कळत नाही

आजी म्हटलं की पटकन
ते सुरकुतलेले हात आठवतात
ती माऊली आणि तिची माया मला
माझ्या बालपणात पाठवतात

मग कळतं त्या हातांनी
दोन पिढ्यांना घडवलय
माझ्या वडिलांना रागवून आणि
मला प्रेमाने वाढवलय

काय सांगू माझ्यासाठी
आजीने काय काय केलय
या जगापासून दूर त्या
गोष्टींच्या गावी नेलय

खोट्या घड्याळांपासून, मोठ्या अंगठ्यांपर्यंत
तिच्याकडे सगळ्याचा हट्ट केलाय
आणि नातू म्हणून हक्काने
तिला भरपूर त्रास दिलाय

पत्ते खेळताना मी जिंकल्यावर
ती लहान मुलांसारखी चिडायची
आणि माझी पुरण-पोळी खुष
जेव्हा ती कटाची आमटी करायची

इंग्रजीतर स्वत: शिकून मग
मला तिने शिकवलय
आणि रोमांचक गोष्टीतून
जगावं कसं ते दाखवलय

हुशारीची गरज नाही लागत
तिने शिकवलं असतं वेड
ही छोटीशी भेट तिला कारण
माझ्याकडून शक्य नाही परतफेड

अजून भरपूर लिहू शकतो
पण ही कविता इथे संपवतो
हे वाचून रडत असेल ती
किमान या ओळीत तिला हसवतो

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. DiP
  October 20, 2010 at 8:21 am

  mayuresh khup chan aahe hi kavita…kharach aaji aashich aasate re…mazi aaji pan aashich aahe…thnkx mala tya kshanacha anubhav tuza kavitetun dilya baddal..

 2. Neha
  May 27, 2013 at 10:23 pm

  हुशारीची गरज नाही लागत
  तिने शिकवलं असतं वेड
  ya cha arth umagala nahi

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: