Home > Poems । माझ्या काही कविता > आरशातला माणूस

आरशातला माणूस

आरशातला माणूस

विचारांचे घोडे दाही दिशांना दौडले आज
घोड्यांनी मनाच्या रथाचे लगाम छेडले आज

शब्द असे कुठे लपून बसले की
कवितेशी नाते मी तोडले आज

जखमा दिसल्यावर, मीठ चोळून
परत हसणारे हसले आज

हुशारांच्या कायद्यात अडकल्यावर
सत्य वेड्यांच्या खांद्यावर रडले आज

स्वप्नांच्या वाटांवर चालणाऱ्यांना
वास्तवातले साप परत डसले आज

आरशातल्या माणूसही अनोळखी झाला
असे काहीसे प्रसंग घडले आज

लोकशाहीवरच्या भाषणात त्यांनी
प्रत्येक उगारलेले बोट मोडले आज

उन्हात आनंदाने रोज मी भाजले स्वत:ला
मात्र चार शब्दांनी मज जाळले आज

भावनांनी घातला गोंधळ कितीही
तरी कागदावर शब्द नाचले आज

— मयुरेश कुलकर्णी

  1. mann
    October 19, 2010 at 12:15 pm

    hey mayuresh… nice poem… n nice pic too….

  2. Santoshi
    October 19, 2010 at 12:36 pm

    Khup Sunder.

  3. sujeet
    October 24, 2010 at 5:28 am

    kharach chan …………….

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: