Home > Poems । माझ्या काही कविता > स्वतंत्र साखळ्या

स्वतंत्र साखळ्या

स्वतंत्र साखळ्या

सकाळी उठल्यावर मी, हात
स्वातंत्र्याच्या साखळीत बांधतो
आणि मग हसत जगाला
माझं स्वातंत्र्य गीत सांगतो

समाजाच्या सूर्यात चकाकल्या कधी
तर साखळ्या, साखळ्या वाटत नाहीत
आणि अंधारात मात्र माझ्या-तुमच्या
साखळ्या वेगळ्या वाटत नाहीत

मला मिळालेलं, कधी माझं नव्हतंच
मी दिलेलं, कधी माझं नव्हतंच
विकत घेतलेलं, कधी माझं नव्हतंच
दान केलेलं, कधी माझं नव्हतंच

समाजाने लिहिले कायदे म्हणून
मी माझ्या स्वातंत्र्याचा चोर
आधी घातले जे हार गळ्यात
मग तेच झाले फाशीचे दोर

स्वतंत्रता शोधताना वाटतं
मी या शोधात मुक्त नाही
माझं स्वातंत्र्य माझ्यात आहे
आणि मी स्वातंत्र्याचा भक्त नाही

‘मला कशाचाही गर्व नाही’
याचा ही माणसाला गर्व नसावा
‘मी किती स्वतंत्र आणि मुक्त’
या स्वातंत्र्याचा पिंजरा नसावा

–मयुरेश कुलकर्णी

  1. Shirin
    October 29, 2010 at 3:26 pm

    मला कशाचाही गर्व नाही’
    याचा ही माणसाला गर्व नसावा
    ‘मी किती स्वतंत्र आणि मुक्त’
    या स्वातंत्र्याचा पिंजरा नसावा

    sahi lines ahet….vichar karaila lavanarya!

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: