Home
> Poems । माझ्या काही कविता > सुचलं काही
सुचलं काही
सुचलं काही
१
असेच सुचले काही
तसेच सुचले काही
लेखणीत शाई भरता भरता
हवे तसे सुचले काही
२
असे कसे सुचले काही
तसे कसे सुचले काही
ती नसताना सुचलेले प्रेम पत्र
ती आल्यावर सुचले नाही
३
हसताना सुचले काही
रडताना सुचले काही
कोऱ्या कागदावर कुस्ती खेळताना
कोण जाणे कसे सुचले काही
४
कसेतरी सुचले काही
चला असेतरी सुचले काही
दु:खाचे दुकान मांडायला
पुरेसे शब्द सुचले काही
५
सुचताना सुचले काही
लिहिताना सुचले काही
नक्की लोकांना आवडेल असे
मला कधीच सुचले नाही
६
सुचले तर सुचले काही
रुसले तर रुसले काही
पण ती रुसल्यावर नेमके
शब्द कधीच सुचले नाही
७
दिवे विझल्यावर सुचले काही
डोळे मिटल्यावर सुचले काही
शेवटी लिहावेच लागले जेव्हा
जागे करणारे सुचले काही
८
सुरूवातीला सुचले काही
मग शेवटी सुचले काही
शेवट परत सुरूवात झाली,
शेवटीचे कधीच सुचले नाही
— मयुरेश कुलकर्णी
Advertisements
Categories: Poems । माझ्या काही कविता
Comments (0)
Trackbacks (0)
Leave a comment
Trackback