सौंदर्य

सौंदर्य

रोज रात्री अंधळा म्हातारा
अंधाऱ्या आकाशाकडे बघायचा
चांदण्यातलं सौंदर्य टिपत
मस्त मजेत जगायचा

एकदा एका तरूणाने विचारलं
डोळे नाहीत तर दिसतं काय?
एकदा वय निघून गेल्यावर
अंधळ्यांसाठी सौंदर्य असतं काय?

म्हातारा हसत म्हणाला मित्रा
हृदयावर हात ठेऊन बसत राहा
डोळे बंद करून वर बघ आणि
देवाचं चांदणं जगत राहा

तरूणाला पटलं, खरं सौंदर्य
सगळ्यांना बघता येत असावं
हृदयाचे डोळे उघडे असले की
बाहेरचं सौंदर्य आत असावं

— मयुरेश कुलकर्णी

  1. December 7, 2010 at 4:04 am

    Amazing….!!!
    khup chhaan

  2. Abhishek
    December 7, 2010 at 4:57 am

    हृदयाचे डोळे उघडे असले की
    बाहेरचं सौंदर्य आत असावं

    Class

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: