लढत राहा

लढत राहा

भेटलात कधी जर जीवनाच्या वाटेवर
तर एवढंच सांगीन लढत राहा
चालताना सगळेच पडतात पण
परत उठणार असाल तरच पडत राहा

निराश झालात कधी तर
म्हणेन प्रयत्न करत राहा
यशाला यायला झाला उशीर
थोडं धैर्य धरत राहा

चुका करायला घाबरू नका
आपलं काम करत राहा
जून्या चुकातून थोडं शिकून
नव्या चुका करत राहा

थोडीशी चिंता देवाला देऊन
थोडं त्याचं काम करत राहा
त्याचा अनुभवी हात धरून
सुखाची शिडी चढत राहा

दोन खिशात दोन हात ठेऊन
शिट्टी वाजवत चालत राहा
हे जगणं म्हणजे आशिर्वाद आहे
मस्त मजेत जगत राहा

भेटलात कधी जर जीवनाच्या वाटेवर
तर एवढंच सांगीन लढत राहा

— मयुरेश कुलकर्णी

  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: