Home > Thoughts । विचारांवर चर्चा > तुम्हाला काय करायचय? तुम्ही काय करू शकता?

तुम्हाला काय करायचय? तुम्ही काय करू शकता?

तुम्हाला काय करायचय? तुम्ही काय करू शकता?

काही दिवसांपूर्वी मी एका फोटोग्राफरची गोष्ट वाचली. त्याला लहान असताना एक जुना कॅमेरा कचऱ्यात टाकलेला मिळाला, आणि त्या दिवसापासून फोटो काढण्याची आवड सुरू झाली. तो फार गरीब होता म्हणून त्याला चांगला कॅमेरा घेता आला नाही. त्याला फोटोग्राफर बनायचं होतं पण प्रदर्शनासाठी लागणारे पैसे त्याच्याकडे नव्हते. बरेच प्रयत्न केले, कंपन्यांकडे जाऊन मदत मागितली पण काहीच झाले नाही. तरीही त्याला त्याचे फोटो लोकांना दाखवायचे होते, फोटो काढत राहायचं होतं आणि मोठा फोटोग्राफर बनायचं होतं. प्रदर्शनासाठी पैसे नव्हते, जागा नव्हती. बरेच दिवस निराश राहिल्यावर त्याने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने फोटोंचे मोठे पोस्टर करून सगळीकडे लावायचे ठरवले. सगळीकडे म्हणजे सगळीकडे, रेल्वे स्टेशनावर, दुकानाच्या बाहेरच्या भिंतींवर, सिग्नलवर, गार्डनच्या बाकड्यांवर, म्हणजे थोडक्यात लोकांना दिसतील अशा ठिकाणांवर. पोस्टर अगदी साधे होतो, रंगीत नव्हते आणि साध्या कागदावर छापलेले. पण संपूर्ण शहर त्याच्या फोटोंचं प्रदर्शन होतं. बरेच वेळा पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकलं कारण काही ठिकाणी फोटो लावणं कायदेशीर नव्हतं. पण तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने परत तेच काम करत राहायची जिद्द सोडली नाही. जसे जसे फोटो वाढू लागले, तसे लोकं ‘हे फोटो कुणी काढले?’ असे प्रश्न विचारू लागले. लोकांना फोटो आवडू लागले कारण त्यांच्या मागे एक संघर्ष होता, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. काहीच वर्षात मोठ्या-मोठ्या कंपन्या त्याच्याकडे जाहिराती करून घेण्यासाठी आल्या. पैसा मिळायला लागला, कॅमेरे बदलू लागले, मित्र वाढू लागले आणि कामं वाढू लागली. पण कितीही नवे कॅमेरे मिळाले तरी त्याचा कचऱ्या मिळालेला कॅमेरा अजूनही त्याच्याकडे आहे, आणि कितीही काम असलं तरी त्याला आवडणारं संपूर्ण शहरातलं प्रदर्शन अजूनही भरतं. आता तो दुसऱ्या नव्या फोटोग्राफर्सचे फोटो पण सगळीकडे लावतो. जितकं मोठ्या कंपन्यांसाठी पैस्यासाठी कामं करतो, त्याच्यापेक्षा जास्त काम समाजसेवा म्हणून करतो. नव्या फोटोग्राफर्सना तर मदत करतोच, पण एन.जी.ओ. साठी विनामूल्य पण कामं करतो. मध्ये त्याने आफ्रिकेत जाऊन तिथल्या एच.आय.व्ही. ग्रस्त महिलांसाठी कां केले. कामे म्हणजे त्यांच्या रोजच्या जिवनातले प्रसंग आणि त्यांच्या समस्या त्याच्या कॅमेरातून लोकांपर्यंत पोचवले. मी त्याचं नाव न लिहिता फक्त ‘तो’ आणि ‘त्याने’ असं म्हणतो आहे, याला पण एक कारण आहे. त्याचं नाव कोणालाच माहित नाही, तो स्वत:चा फक्त जे.आर. असा परिचय करून देतो. त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं नाव महत्वाचं नाही त्याचं काम महत्वाचं आहे. आज त्याने त्याच्या कलेतून कितीतरी लोकांची जिवनं बदलली आहेत. हे सगळं करताना त्याचं नाव कोणालाही माहित नाही, आणि पैस्याची किंवा प्रसिध्दीची लालसा नाही. त्याला फक्त त्याने काढलेले फोटो लेकांना दाखवायचे होते, पण आज त्याच्या कलेतून त्याने हे जग चांगल्यासाठी बदलले आहे. आपल्याला आवडत असलेलं काम करताना आपण स्वत:लाच नही तर दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकतो.

‘तुम्ही काय करू शकता?’ या प्रश्नाचं उत्तर, जे.आर. सारख्या कलाकारांकडे बघून, ‘तुम्ही काहीही करू शकता’ असंच देता येईल. दुसरा प्रश्न होता ‘तुम्हाला काय करायचय?’ याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. जे.आर. ला फोटो काढायचे होते, काढत राहायचे होते आणि लोकांपर्यत पोचवत राहायचे होते. आवडणाऱ्या गोष्टी करायच्या असतील तर खरंच तुम्ही काहीही करू शकता. कठीण परिस्थितीत तर भरपूर लोक असतात, पण जे त्यातूनही स्वत:चा रस्ता तयार करतात ते लोकांसाठी उदाहरणं बनतात. ‘तुम्हाला काय करायचय?’ हे ठरवण्याची वेळ आज आहे, आता आहे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात कदाचित तुम्हाला पैसा मिळणारही नाही, पण खुप आनंद नक्कीच मिळेल. या संगणकाच्या युगात आपल्याला आवडतं ते करण्याच्या भरपूर संधी आहेत. कुणी फोटोंकडे बघत नव्हतं तर जे.आर. ने त्याचे फोटो शहरभर लावले. जर लेखक बनायचं असेल तर तुमचं लिखाण इंटरनेट व्दारे लोकांपर्यंत पोचवा, ईमेल करा किंवा ब्लॉग लिहा. लोकांना तुमचं लिखाण किंवा तुमचं काम आवडेल की नाही याचा निर्णय लोकांवर सोपवा. त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्हाला आवडतय ते करत राहा, तुम्हाला खरच खुप आनंद मिळेल. सहसा मी मित्रांना असं सांगायला लागलो की ते मला दोन कारणं सांगतात. एकतर आवडतय ते करण्यासाठी पैसे नाहीत नाहीतर वेळ नाही. आवडत्या गोष्टी करायला वेळ नसेल तर वेळ काढा. आपल्याला एकच आयुष्य मिळतं, त्यातही आपण आपल्याला नावडत्या गोष्टी करत राहीलो तर आपण मजेत कसे जगणार. नोकरीमुळे काही लोकांना वेळ मिळत नसेलही, पण संध्याकाळी घरी आल्यावर, सुट्टीच्या दिवशी किंवा रजा काढल्यावर वेळ मिळू शकतो. हा वेळ आपण नीट वापरणं गरजेचं आहे. आवडत्या गोष्टी करायला पैसे नाहीत हे पण कारण बरोबर वाटत नाही. पैसे मिळवण्यासाठी नोकरी करा, किंवा थोडी काटकसर करा. खरंतर आवडत्या गोष्टी न करण्यासाठी कुठलंच कारण पुरेसं वाटतं नाही. आपण सगळेच आपल्या कलेने किंवा आपल्या जिद्दीने जगात बदल आणू शकतो, लोकांना पण आनंद देऊ शकतो.

जर आपण चांगल्या गोष्टी प्रामाणिकपणे करत राहिलो तर लोकं नक्की लक्ष देतात. याचं उदाहरण म्हणजे माझ्या रोजच्या रस्त्यावर एक बेकरी आहे. मी सकाळी रस्त्यावरून जाताना त्या बेकरीत तयार होणाऱ्या ताज्या बिस्कीटांचा मस्त सुगंध येतो. हा प्रकार कितीतरी दिवस होत होता. आधी मला ती बेकरी कुठे आहे ते माहितही नव्हते, पण त्या वासामुळे मी ती बेकरी शोधली आणि बिस्कीटं विकत घेतली. अजूनही तो वास आला की खुप मस्त वाटतं, बिस्कीट खावसं वाटतं. त्या वासामुळे त्या बेकरीला कसलीही जाहिरात करावी लागली नाही. खरंच तुम्ही काहीतरी चांगलं करत असाल तर लोकं लक्ष देतात, इतरांना सांगतात. म्हणूनच आपल्याला आवडतं ते करत राहावं, आणि लोकांना आवडेल की नाही याचा निर्णय त्यांच्यावर सोपवावा. निखळ आनंद मिळतो म्हणून काहीतरी चांगलं करण्यासारखं पुण्य नाही. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीतून लोकांना प्रेरणा, मदत आणि आनंद मिळू शकतो.

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. आल्हाद
  March 19, 2011 at 11:22 am

  मयुरेशा, अजून माहिती दे या माणसाची…

 2. March 19, 2011 at 11:48 am

  Hi Alhad, mala vatlelach tu interested asnaar. Khup inspiring ahe tyachi story. Just google ‘JR french photographer’. You can also go to http://www.ted.com and search his name. There is a video of his work there.

 3. Shirish Kamdar
  March 19, 2011 at 12:12 pm

  Excellent and very true……….. That is the reason I like your poems because they are written for your own satisfaction and pleasure, not worrying about some one else’s reactions………

  Keep it up

  God is positively with you

  Kaka

 4. Shirin
  March 19, 2011 at 5:46 pm

  “खरंच तुम्ही काहीतरी चांगलं करत असाल तर लोकं लक्ष देतात, इतरांना सांगतात. म्हणूनच आपल्याला आवडतं ते करत राहावं, आणि लोकांना आवडेल की नाही याचा निर्णय त्यांच्यावर सोपवावा.”
  Very true, how much we do our satisfaction? apan nehamich aplyala shewtchya prioritymadhye thevat asato..last! apan aplyawar kami ani dusaryancha jast vichar karato! kadhitari apalyala changale watate mhanun kahi kele tar…..tar..ase photographer janmala yetat!

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: