चारोळ्या

चारोळ्या

एकट्या संध्याकाळी कॉफी पिताना
मी सगळ्यांचं जीवन जगू शकतो
जितका लोकांसमोर चांगला असतो
तितकाच वेड्यासारखा वागू शकतो

आज परत शब्दांनी माझ्या
लेखणीशी नातं जोडलं
म्हणून माझ्या मनाने
वास्तवाशी नातं तोडलं

शब्द हाडं मोडत नाहीत
शब्द हृदय मोडतात
पण तेवढ्याच पटकन
हृदयाला हृदयाशी जोडतात

आज परत रांगत रांगत
मनाच्या वाटेवर चालतोय
सगळं जे सांगायचं आहे ते
फक्त चार ओळीत मांडतोय

तीन हुशार माणसांची
भरली होती हुशार सभा
एकाने चढवलं, एकाने पाडलं
जेव्हा तिसरा राहिला उभा

मी आणि माझा एकटेपणा
दोघे निवांत बसत होतो
दोन जुन्या मित्रांसारखे
मस्त गप्पा मारत होतो

माहित नाही मला
गोष्ट खोटीही असेल
गोष्टीत सत्य आणू नये
हेही लोकांना पटेल

चांगल्या वहित लिहिलेली
चारोळी माझी वाटत नाही
तीन ओळी खरडल्या जातात
चौथी काही केल्या सुचत नाही

— मयुरेश कुलकर्णी

  1. pradnya
    April 10, 2011 at 9:11 am

    ya its so cute

  2. pradip
    May 12, 2011 at 9:37 am

    mast, khup chan

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: