Home > Poems । माझ्या काही कविता > चालणारी प्रेतं

चालणारी प्रेतं

चालणारी प्रेतं

चालणारी प्रेतं कशी
मेल्यासारखी चालतात
स्वत:च्या हृदयाची नाही
लोकांची भाषा बोलतात

हृदय कमी बोलून
अगदीच अबोल झालं असतं
जिवंत नाही असं समजून
त्याला खोल गाडलं असतं

एक संधी तरी द्या रे
त्याला फार बोलायचं आहे
परत जिवंत होऊन त्याच्या
रस्त्यावर चालायचं आहे

गुदमरायचं आहे त्याला
आणि तडफडायचं आहे
आकाशात पडता पडता
परत ऊंच उडायचं आहे

जगू द्या रे त्याला
त्याचं एकच आयुष्य आहे
म्हणून हृदयाचं ऐकणं हे
सगळ्यांनाच आवष्य आहे

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
  1. Piyush
    August 3, 2011 at 6:43 pm

    nice….i like this pome by my heart.

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: