चारोळी

चारोळी

माझ्या काय कामाचा
हा वसंत उशीरा आलेला
कसा फुलवू मी माझा
मोगरा केव्हाच कोमेजलेला

मिटर मध्ये बसत नाही
माझी कविता बेताल आहे
लोकांच्या तालावर नाचेल कशी
तिला माझ्या जिवनाची चाल आहे

चुर्गळलेले कागद आणि
कुस्करलेले मोगरे
झाल्या सुंदर कविता
झाले सुगंधी गजरे

वाया जाण्याइतका नाजूक
त्यांच्या हृदयाचा ठोका नाही
थांबणाऱ्यांचा चालणाऱ्यांना
कधीच कसलाच धोका नाही

आज येणार नाही कविता
आज तिची रजा आहे
मुकं राहून सहन करायची
आज मला सजा आहे

हुशारांचा एकच रस्ता
आमच्या अनेक वेड्या वाटा
एकाच किनाऱ्यावर जाऊन
आपटणाऱ्या असंख्य लाटा

भरलेले कागद आणि
तृप्त, रिकामी मने
जणू तुझ्या सावलीत झोपून
विसरावी जगाची उन्हे

कोणी केकेला अपमान
माझ्या मनाला कातरत गेला
एक भलताच खोल रंग
आज कवितेत उतरत गेला

— मयुरेश कुलकर्णी

  1. Vaibhav
    April 5, 2011 at 8:49 am

    khup chan…………
    nice one..!!🙂

  2. rajendra bhandari
    April 5, 2011 at 10:01 am

    मयुरेश ,चारोळी सुंदर जमलीय.मस्त….

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: