चारोळी

चारोळी

चालताना पाय माझे
तुझी दिशा शोधतात
सगळ्याच वाटा कशा
तुझ्यापर्यंत पोचतात

लिहायला लागलो तर
हे आकाशही कमी पडेल
रडायला लागलोच तर
देवही माझ्याबरोबर रडेल

जाळताना त्यांना वाटलं
मी असा जळणार नाही
मी डागही खोडला आता
कोणालाच कळणार नाही

काही गोष्टी हरायला असतात
काही लढवायच्या असतात
काही फक्त सांगायच्या तर
काही जगायच्या असतात

रडणं लपवून मी
हसायला शिकलो आहे
कदाचित त्याचमुळे मी
आतापर्यंत टिकलो आहे

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. gangaram mate
  April 11, 2011 at 10:13 am

  good! nice poet

 2. Sameeksha Vaity
  April 11, 2011 at 3:10 pm

  mast ahe!

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: