Home > Poems । माझ्या काही कविता > कागदावरची काळी शाई

कागदावरची काळी शाई

कागदावरची काळी शाई

डोळ्यातून टपकत टपकत
कागदावर पाणी पडले
काळी शाई फुटत फुटत
शब्द रडले आणि घडले

शाई फुटत गेली आणि
शब्द विर्घळत होते
तरी अबोल कागदावर
दु:ख सहज उतरत होते

हृदयावर दु:खाचे काळ्या
शाईसारखे ठसे होते
हात थरथरत होते
चालत कसेबसे होते

प्रश्न मला पडला की
शब्द कसे वाहून गेले?
शब्द वाहून गेल्यावरही
दु:ख का राहून गेले?

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. prasaad
  April 12, 2011 at 9:41 am

  प्रश्न मला पडला की
  शब्द कसे वाहून गेले?
  शब्द वाहून गेल्यावरही
  दु:ख का राहून गेले?

  अप्रतिम मित्रा !
  कधी या संशोधकांचा इतका राग येतो
  हाताहून सगळे घरंगळले की खाली पडले म्हणतात ….
  हातातून निसटून गेलेले क्षण हृदयी कां असे ठसठसतते
  अश्रुन्वाटे घुसमटलेले दुख: कां मनी असे बिलगुनी बसते
  प्र…साद

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: