चारोळ्या

चारोळ्या

आजचा पाऊस कसा
पडणार म्हणून पडत होता
न तो तुला भिजवत होता
न तुझ्यासाठी रडत होता

धारदार तलवार तीच जी
रक्त न काढता कापू शकते
सर्वात खोल जखम तीच जी
जगाच्या डोळ्यापुढे लपू शकते

गैरसमज करून घेऊ नका
मी लढणारा माणूस आहे
रोज हळूहळू मरण्याऐवजी
सगळ्यातून जगणारा माणूस आहे

लढायला जाताना हातात
मरण घेऊन जावं
लढून येताना जगायचं
कारण घेऊन यावं

जखमांची माझ्या काळजी
कोणीही कधीही करू नये
होणार होतं ते होऊन गेलं
त्यांचं कारण विचारू नये

माझ्या गाण्याला वेळ लागेल
तू तुझी गोष्ट सांगून जा
माझ्या जखमांचे रंग मला
तू तुझ्या रंगात रंगून जा

हे शब्द का बेरंग असे
या कवितेत माझं रक्त नाही
इतकी निर्बळ माझी वेदना नाही
मी एवढा अशक्त नाही

मधेच थांबायचं असतं तर
कधी चाललोच नसतो
खोटंच बोलायचं असतं तर
कधी बोललोच नसतो

मला उगीच वाटलं माझा
लढायला श्वास कमी पडेल
कोणाला माहित होतं तुझा
माझ्यावरचा विश्वास कमी पडेल

मी जाळून स्वत:ला
तयार केला माझा दिवा
तरी आयुष्य म्हटलं
मला अजून प्रकाश हवा

सगळ्यांनी नावं ठेवली त्याला
सगळ्यांनी वेड्यात काढला
तो म्हणाला तेव्हाच खरतर
त्याचा आत्मविश्वास वाढला

शब्द आज का तुझे
माझ्याकडे आलेच नाही?
त्यांनी का मला खेचून
तुझ्याकडे नेलेच नाही?

–मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. prasad
  April 25, 2011 at 9:37 am

  Surekhch !!! Mitra ekdam bhari !

 2. milind
  April 27, 2011 at 6:56 pm

  khup sundar

 3. Sameeksha Vaity
  April 29, 2011 at 2:16 pm

  phaar chaan ahe!!!!…mastach!

 4. Prasad
  May 4, 2011 at 2:54 pm

  todlaas mitra…

  Salla:-
  Aankhi kahi Desh-bhaktipar Charolya lihi ki…

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: