बाकी आहे…

बाकी आहे…

सगळे गेले, आता तुझं येणं बाकी आहे
येऊन मला तुझ्याबरोबर नेणं बाकी आहे

वसंत फुलवून गेला, खुलवून गेला तुला
आता पावसासारखं तुझं रडणं बाकी आहे

काल पर्यंत मी होतो तुझा, तू नाव्हतीस माझी
आज पासून माझं तुझ्याबरोबर नसणं बाकी आहे

पिंजऱ्यात टाकलं आणि पंखही कातरले
आता या गरुडाचं तडफडणं बाकी आहे

तू जाताना देऊन गेलीस सोडचिठ्ठी
माझं अजून तिला उघडणं बाकी आहे

घाव खोल गेला, रक्तही वाहून गेलं
फक्त तो रंग कागदावर उतरणं बाकी आहे

जिवना रे सगळेच का काढतात वेड्यात मला
आपलं तर अजून वेड्यासारखं वागणं बाकी आहे

गुडघे टेकण्याएवढा झालो न मी अशक्त कधी
अजूनतरी माझ्या लेखणीचं थांबणं बाकी आहे

मरणा रे, अशी कहाणी अर्धवट नको थांबवूस
अजून लढणं काही आहे, माझं जगणं बाकी आहे

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. uday
  May 8, 2011 at 10:26 am

  घाव खोल गेला, रक्तही वाहून गेलं
  फक्त तो रंग कागदावर उतरणं बाकी आहे

  जिवना रे सगळेच का काढतात वेड्यात मला
  आपलं तर अजून वेड्यासारखं वागणं बाकी आहे

  गुडघे टेकण्याएवढा झालो न मी अशक्त कधी
  अजूनतरी माझ्या लेखणीचं थांबणं बाकी आहे

  मरणा रे, अशी कहाणी अर्धवट नको थांबवूस
  अजून लढणं काही आहे, माझं जगणं बाकी आहे

  घाव खोल गेला, रक्तही वाहून गेलं
  फक्त तो रंग कागदावर उतरणं बाकी आहे

  जिवना रे सगळेच का काढतात वेड्यात मला
  आपलं तर अजून वेड्यासारखं वागणं बाकी आहे

  गुडघे टेकण्याएवढा झालो न मी अशक्त कधी
  अजूनतरी माझ्या लेखणीचं थांबणं बाकी आहे

  मरणा रे, अशी कहाणी अर्धवट नको थांबवूस
  अजून लढणं काही आहे, माझं जगणं बाकी आहे

  घाव खोल गेला, रक्तही वाहून गेलं
  फक्त तो रंग कागदावर उतरणं बाकी आहे

  जिवना रे सगळेच का काढतात वेड्यात मला
  आपलं तर अजून वेड्यासारखं वागणं बाकी आहे

  गुडघे टेकण्याएवढा झालो न मी अशक्त कधी
  अजूनतरी माझ्या लेखणीचं थांबणं बाकी आहे

  मरणा रे, अशी कहाणी अर्धवट नको थांबवूस
  अजून लढणं काही आहे, माझं जगणं बाकी आहे

  मित्रा लाजवाब आहे
  उदय

 2. Shirin
  May 8, 2011 at 1:26 pm

  मरणा रे, अशी कहाणी अर्धवट नको थांबवूस
  अजून लढणं काही आहे, माझं जगणं बाकी आहे

  mala kavita positive watali……eapecially end!!!!

  Is this snap taken by you?

 3. Dr Aditya Akerkar
  May 10, 2011 at 5:19 am

  Amazing stuff Mayuresh

 4. Milind Kulkarni
  May 27, 2011 at 10:19 am

  Atishay uttam kavita.

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: