चारोळी

चारोळी

हुशारीच्या मुखवट्यामागे
लपलेली जूनी चूक असते
घायाळ हृदयात परत
लढायची खरी भूक असते

प्रत्येका शब्दावर माझ्या
रक्ताचा प्रभाव आहे
सहज पुसले जात नाही
हाच रक्ताचा स्वभाव आहे

आमची काळजी करू नये
आम्ही टिकणारी माणसं आहोत
तुटलेल्या काचा मुठीत धरून
आम्ही हसणारी माणसं आहोत

माणसाने दोनच नियम पाळावे
लोकांचं फारसं ऐकू नये
आणि शांत झोप लागणार नाही
असं काहीही करू नये

रक्त मागणाऱ्या तलवारी
म्यानात शांत नसतात
भराऱ्या मारणारे गरूड
पिंजऱ्यात निवांत नसतात

अर्धवट सुटलेले रस्ते
आपली वाट बघतात का?
परत दिसले नाहीत तरी
ते आपल्या मनात उरतात का?

लढाई सुरू राहावी म्हणूनतरी
मला जिद्दीने लढायला हवे
लढता आलं नाही तरी मी
रणांगणातच पडायला हवे

— मयुरेश कुलकर्णी

  1. June 12, 2011 at 11:32 am

    सुंदर! भिडली!

  2. deepti
    June 13, 2011 at 5:05 am

    masta ahet saglyach charolya…. !!

  3. Sameeksha
    July 23, 2011 at 10:49 am

    khup khup khup chaan!!!

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: