चारोळी

चारोळी

सूर्य समुद्र तापवतो आणि
काळा ढग भरून येतो
त्यात प्रत्येकाचा वाटा असला
तरी पाऊस कौतुक घेऊन जातो

पावसावरच्या रागाला माझ्या
आज काही कारण नाही
ओला होत होतो मी एकटाच
पण माझं भिजणं विनाकारण नाही

मी कागदाचे तुकडे विकतो
मी कविता विकू शकत नाही
दिसणाऱ्यांना दिसते ती पण
सगळ्यांना समजवू शकत नाही

पाऊस तरीही पडणार होता
तिला तसाच रडवणार होता
डोळ्यांनी बरसण्याचं कारण हेच,
की पाऊस एकट्यालाच भिजवत होता

आपण सगळेच कसे पावसात
हसू शकतो, रडू शकतो
हास्य आपोआप पसरतं आणि
रडणं आपण लपवू शकतो

खाली बघून चालणारे
रस्त्यावर संशय घेतात
वर बघून चालताना पडणारे
देवावर विश्वास ठेवतात

भावना शब्दात बसली पाहिजे
शब्दाच्या जाळ्यात फसली पाहिजे
ती जशी रूसली पाहिजे
तितकीच गोडी हसली पाहिजे

मी कविता करत नाही
ती प्रत्येका मनात असते
जशी तिजोरीतली माया
अदृश्यपणे घरात असते

चार दिवस टिकणारं
प्रेम किती छोटं असतं
चारच ओळीत संपणारं
काव्य किती खोटं असतं

कालचं एकटं वादळ मला
खिडकीतून बघता आलं नाही
त्याला सोबत द्यायला गेलो
मला घरात राहाताच आलं नाही

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. Gajanan
  June 20, 2011 at 7:39 am

  very very very good.

 2. June 20, 2011 at 9:51 am

  Mast avadli. Paus padat astanach vachali. tyamule kuphach avadli.

 3. prasad
  June 20, 2011 at 10:40 am

  Mastch Mitra !

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: