Home > Poems । माझ्या काही कविता > माझ्या आत कुठेतरी…

माझ्या आत कुठेतरी…

माझ्या आत कुठेतरी…

एक आग लागली आहे, जी विजत नाही
एक असा भाग आहे जो, पावसातही भिजत नाही

एक घोडा आहे जो थांबता थांबत नाही
एक जखम आहे जी आता जोंबत नाही

एक भूक अशी लागली की जिला अंत नाही
एक शांतता वादळासारखी, शांत असून शांत नाही

एक बाळ आहे जे सुखातही हसत नाही
दु:खात मस्त असतं, रडत बसत नाही

एक वीर आहे जो सहसा तलवार काढत नाही
एक वीर आहे जो तलवारीशिवाय लढत नाही

एक कॉफीचा रिकामा कप, जो कधीही भरत नाही
एक म्हातारं स्वप्न आहे, जे मरता मरत नाही

माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे जो कोणाला कळत नाही
एक मी आहे जो कोणाला ओळखत नाही

— मयुरेश कुलकर्णी

  1. Sukeshini
    July 1, 2011 at 12:29 pm

    Good one..🙂

  2. Sameeksha
    July 23, 2011 at 6:58 am

    nice

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: