Home > Poems । माझ्या काही कविता > माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

कोणी दिली नाही म्हणून नाही
मी घेतली नाही म्हणूनही नाही
कुठल्या सिंहासनावर नाहीच नाही
तर कुठल्या हृदयावरही नाही

थोडी हुशारी होती…आता तिचाही पत्ता नाही
माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

चोरतील म्हणाले ते कविता माझ्या
माझे शब्द ही माझे उरणार नाही
थोडं दु:ख जपून ठेवलं आहे मी आत
कुणीही ते तर चोरू शकणार नाही

अरे लुटून लुटता यावी…अशी ही मालमत्ता नाही
माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

ही काळी आणि कडू जिवनाची आहे
ही सामान्य जगण्याची कॉफी नाही
कबुल नाही केली तरी चूक ती चूकच
आणि मागितली नाही तर माफी नाही

कुठेही खपेल हा…असा रंगबदलू भत्ता नाही
माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

करू नका थोडीशीही चिंता पराभवाची
आणि विजयाचीही गाऊ नकात गाणी
अजून लढणारे जीवंत आहेत रे
सांगू नकात पराक्रमांची काहाणी

न लढता यश यावं…अशी आपेक्षा आत्ता नाही
माझ्याकडे कसलीही सत्ता नाही

–मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. July 5, 2011 at 8:53 am

  ‘सत्ता नसण’ ही अनेकदा एक सत्ता होते .. नीट विचार केला तर. कारण मग भीती कशाचीच राहत नाही!
  राजकारणी वाचतात का तुमचा ब्लॉग? 🙂 फक्त सत्तेवरचे नाही, सगळीकडे असेलेले राजकारणी!!

 2. archana patil
  July 5, 2011 at 10:07 am

  kharach….jagat konachihi kaslihi satta nahi..ayushyat pratyekala satta hi havi asate ti manaje dusryanchy don shabdasthi……

 3. milind
  July 5, 2011 at 7:33 pm

  excellent poem

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: