Home > Poems । माझ्या काही कविता > मी गेल्यावर सांगा त्यांना

मी गेल्यावर सांगा त्यांना

मी गेल्यावर सांगा त्यांना


मी गेल्यावर सांगा त्यांना…

स्वत:च्या तालावर नाचलो की
वाटे पावसातला मोर मी
फुलांबरोबर तितकाच कोमल
जितका दगडात कठोर मी

— मयुरेश कुलकर्णी


मी गेल्यावर सांगा त्यांना
तुमच्या हृदयात राहणार मी
आणि गेल्यावर रडू नका कारण
जाताना नाही रडणार मी

— मयुरेश कुलकर्णी


आपण नशिब निवडत नाही
नशिब आपल्याला निवडत असतं
आपण त्याच्यावर चिडतो आणि
ते आपल्याला चिडवत असतं

बदलता नाही आलं तर भोगतो
नशिबावर नाही रडणारा मी
मी गेल्यावर त्यांना सांगा
जायच्या वेळेपर्यंत लढणारा मी

— मयुरेश कुलकर्णी


मी गेल्यावर सांगा त्यांना
एक पवित्र लढाई लढलो मी
सगळंच अर्पण केल्यावर
देवाच्या चरणांपाशी पडलो मी

— मयुरेश कुलकर्णी


मी गेल्यावर त्यांना सांगा
काट्यांनाही बोचायचो मी
रक्तातल्या प्रेमाने त्यांच्यातून
त्यांचं विश खोचायचो मी

— मयुरेश कुलकर्णी


मी गेल्यावर त्यांना सांगा
एक वेडा जन्माला आला होता
जगाची हुशारी नाही जमली पण
जगाला वेड लाऊन गेला होता

— मयुरेश कुलकर्णी


मी गेल्यावर सांगा त्यांना
एका थडग्यातून दुसऱ्यात गेला
एकाशी आपुलकीने भांडला आणि
दुसऱ्याचा प्रेमाने स्वीकार केला

— मयुरेश कुलकर्णी


मी गेल्यावर सांगा त्यांना
वेडा एक आणि हुशार अनेक
पण वेडे इतिहास घडवतात आणि
हुशारांचा करत नाही कुणी उल्लेख

— मयुरेश कुलकर्णी


चुक झाली, रक्त वाहू लागलं
त्याला थांबवण्याईतका, मी क्रूर नाही
चुकीने प्रवासाला सुरूवात झाली
यशही आता, फारसं दूर नाही

चूका झाल्या की, त्या होऊ देतो
माझ्या चूका मी खोडत नाही
मी गेल्यावर सांगा त्यांना
फक्त यशाशी मी नाव जोडत नाही

— मयुरेश कुलकर्णी

१०
मी गेल्यावर सांगा त्यांना
काल मृत्यु मला चाटून गेला
माझी चव आवडली नाही म्हणून
परत धरतीवर मला थुंकून गेला

— मयुरेश कुलकर्णी

११
काही समुद्र बघून घाबरतात
काही थेंब-थेंब, लाट-लाट लढतात
मी गेल्यावर सांगा त्यांना
काही खड्डे नंतर, आधी वाट बघतात

— मयुरेश कुलकर्णी

१२
मी गेल्यावर सांगा त्यांना
लढाई तरीही थांबणार नाही
वेडे येऊन गेले तरी
वेड्यांचं वेड हरणार नाही

— मयुरेश कुलकर्णी

१३
मी गेल्यावर सांगा त्यांना
जिवनातले क्षण नाही मोजले मी
पण प्रत्येका क्षणातले
दडलेले जीवन शोधले मी

— मयुरेश कुलकर्णी

  1. Seema Mhatre
    August 31, 2010 at 1:29 pm

    Hey Mayu ,
    Kay yaar suddenly tuzya payach padavasa vatla yaar . kay masta kavita yaar atta tar pratyek line var wah wah mhanat hote yarr. kasa mahan ahes re , simply unmatchingly supurb kavita man . seriously , atta na wah supurb yachya peksha kahi chan shabda shodhave lagnar vatata. karan its really to good to be true ::))

  2. Sameeksha vaity
    September 1, 2010 at 2:57 pm

    Hey hi,
    I really liked d 10th n d last verse….khup chaan ahe!!!….it was actually for dis poem sorry!!!!

  3. Mugdha
    October 2, 2010 at 12:21 pm

    This is one of your finest creations! Too good.

  1. No trackbacks yet.

Leave a reply to Mugdha Cancel reply